निवडणूक निकालानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला; महाजन म्हणाले, आता महाराष्ट्र …

मुंबई – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पण संपूर्ण देशाला उत्तर प्रदेशच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यात एकूण 403 जागांसाठी निवडणूक झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजपने 202 ची मॅजिक फिगर पार केल्याचे सुरूवातीच्या कलांनुसार दिसत आहे.

विशेष म्हणजे समाजवादी पक्षालाही शंभरच्या जवळपास जागा मिळाल्या आहेत. या राज्यात मागील 37 वर्षात कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळालेली नाही. मतमोजणीतील सुरूवातीचे कल पाहिल्यास भाजप इतिहास घडवणार असल्याचे दिसते. बीएसपी आणि काँग्रेस स्पर्धेत कुठेच नसल्याचे दिसत आले. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, असं जवळपास स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, भाजपा यशस्वी कामगिरी करत असल्याने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची आशा वाढल्याचं दिसत आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांनी ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असा घोषणा दिल्या. यामध्ये भाजपा नेते गिरीश महाजनदेखील होते. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी निकालावरुन शिवेसना, काँग्रेसवर जोरदार टीका केली. भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असंही म्हटलं आहे. पाचही राज्यात काँग्रेसने एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, काँग्रेसला एकुण ३५ जागाही मिळत नाहीयेत असंही ते म्हणाले.