धक्कादायक! मॅच हारल्याच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात मारली बॅट, १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Cricket Player Dies : भारतात क्रिकेट खेळाची लोकप्रियता खूप जास्त आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हा खेळ खेळताना दिसतात. या खेळात अनेकदा संघांमध्ये विजय-पराजयावरून मारामारी होत असते. राष्ट्रीय संघाबाबत बोलायचे झाले तरी या खेळात खेळाडूंमध्ये भांडणे पाहायला मिळतात.

तुम्ही क्रिकेट सामन्यांमध्ये नो बॉल, चुकीचे निर्णय आणि स्लेजिंगवरून खेळाडूंना आपापसात भांडताना पाहिलं असेल, पण नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे ज्याने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. हे प्रकरण राजस्थानमधील आहे, जिथे मुलांमध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यातील पराभवाचे दुःख सहन न झालेल्या मित्राने आपल्याच मित्राची हत्या केली. यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

 

क्रिकेट मॅचमध्ये झाला खून, मित्रानेच मित्राची हत्या केली
वास्तविक, हे प्रकरण राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील भवानी मंडीचे आहे, जिथे मंगळवारी खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात पराभूत संघाच्या मुलाने खून (Cricket Player Dies) केला. राजस्थान टेक्सटाईल मिल्स लेबर कॉलनीत क्रिकेट मॅच खेळत असलेल्या २४ वर्षीय मुकेशने (मुकेश मीना) अवघ्या १५ वर्षांच्या प्रकाशची हत्या केली.

प्रकाश (प्रकाश साहू) आपल्या संघाच्या विजयाचा आनंद साजरा करत होता, परंतु विरुद्ध संघातील त्याचा मित्र मुकेश याला ते सहन झाले नाही आणि त्याने मैदानावर आपला संयम गमावून त्याचा मित्र प्रकाश याच्या डोक्यावर बॅटने वार केले आणि त्याला एवढा मार लागला की तो जखमी झाला.त्याचा मृत्यू झाला.प्रकाश इतका गंभीर जखमी झाला होता की त्याला जगणे कठीण झाले होते आणि त्याला बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथून त्याला कोटा येथे रेफर करण्यात आले आणि तेथे त्याचा मृत्यू झाला.

मुकेश मीणाला आयपीसी कलम ३०२ (हत्या) अंतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्रकाश आणि मुकेश हे मित्र होते. प्रकाश हा भवानी मंडी येथील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. मुकेश बीए फायनलला होता. या घटनेनंतर त्याच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू