Ramdas Athawale | लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष वेगळा विचार करणार ? जाणून घ्या आठवलेंनी काय घेतला निर्णय  

Ramdas Athawale | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिणी ची बैठक नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.

मागील 10 वर्षांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार ने देशभरात चांगले काम करून देशाची प्रगती केली आहे. जम्मू काश्मीर मध्ये आता पर्यटन आणि उद्योग वाढत आहेत. कलम 370 हटवण्यात आले आहे. महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देणारा कायदा संमत झाला आहे. रस्ते विकास मोठ्या प्रमाणात होत आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक चांगली स्मारके मोदींच्या काळात उभी राहिली आहेत. त्यामुळे आगामी  लोकसभा निवडणुकीत देशभर रिपब्लिकन पक्षाचा भाजप प्रणित एनडीए ला पाठिंबा देण्याचा निर्णय  रिपाइं च्या राष्ट्रिय कार्यकारिणीत सर्वसंमतीने घेण्यात आला.या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे देशभरातील 30 राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत काही राज्यांत रिपब्लिकन पक्ष स्वबळावर काही उमेदवार उभे करण्याची चाचपणी करीत आहे. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाल्या पाहिजेत. त्यात शिर्डी ही जागा रिपाइंला मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी देशभरातील रिपाइं च्या प्रतिनिधींनी बैठकीत केल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी  आज प्रसिद्धी माध्यमांना दिली.

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरिणी च्या बैठकीला  अध्यक्षस्थानी रिपाइं चे  राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले; सरचिटणीस अविनाश महातेकर; कार्याध्यक्ष वेंकट स्वामी ( कर्नाटक) राष्ट्रीय उपाध्यक्ष जेड कशिटो एपथो (नागालँड ); ब्रह्मानंद रेड्डी( आंध्र प्रदेश) परम शिवा नागेश्वर राव गौड; रवी पासूला ( तेलंगणा) विनोद निकाळजे; पवन गुप्ता ; मिरझा मेहताब बेग ( दिल्ली) मंजू छिबेर ( पंजाब) कैलास दिवाण( पश्चिम बंगाल) रिपाइं नागालँडचे अध्यक्ष मुघातो आये ;  आसाम ; गुजरात चे शैलेशभाई शुक्ला;भरुलता कांबळे ;  राजस्थानचे राधा मोहन सैनी;  ऍड.नितीन शर्मा;  आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधान समर्थक आहेत. त्यांनी आपला परिवार ही देशातील 140 कोटी जनता आहे असे मानले आहे. मोदी संविधनानुसार सर्व जाती धर्मियांना समान मानून सर्वांसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहेत.नवीन संसद भवन मोदींनी संविधान सदन नाव दिले आहे.त्यामुळे संविधानाला कोणताही धोका नाही. जे बेताल बोलतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. त्यांना दलितांबद्दल वाईट बोलायची सवय आहे. त्यांची भूमिका ही भाजप ची भूमिका नाही. संविधानाने सर्वधर्मसमभाव शिकवला आहे. त्यामुळे हिंदुराष्ट्र ला आमचा पाठिंबा नाही.  हिंदू बहुसंख्य आहेत.हिंदू धर्माचा आदर केला पाहिजे.तसा सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. हाच सर्वधर्मसमभाव असणारे भारत राष्ट्र आम्ही मानतो.सर्वधर्मसमभावातून राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करीत आहेत.त्यामुळे आमचा प्रधानमंत्री मोदींना पाठिंबा आहे असे ना.रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य