Ravindra Dhangekar | धंगेकरांचा तोल ढळला; थेट दिवंगत गिरीश बापटांवरच केली टीका; म्हणाले…

Ravindra Dhangekar | धंगेकरांचा तोल ढळला; थेट दिवंगत गिरीश बापटांवरच केली टीका; म्हणाले…

Ravindra Dhangekar |  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्याबद्दल केलेल्या टिकात्मक वक्तव्य केल्याचा प्रकार घडला आहे . या वक्तव्याची सध्या चर्चा राजकीय क्षेत्रात होत असून धंगेकरांनी केलेल्या या विधानाबद्दल नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. या तीनही उमेदवारांनी त्यांच्या दृष्टिकोनातून “पुण्याचं व्हिजन” काय आहे यांची मांडणी केली. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे यांनी त्यांचे पुण्याच्या विकासाबद्दलच्या व्हीजनबद्दल सविस्तर मांडणी केली. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांचे ‘व्हीजन’ न सांगता केवळ टीका करण्यावर भर दिला.

ही टीका करताना त्यांना ते काय बोलत आहेत याचे भान राहिले नाही. त्यांनी पुण्याच्या माजी खासदारांचा उल्लेख करत बापट साहेब, शिरोळे साहेब सभागृहात कितीवेळा बोलले? असा उल्लेख केला. याला मोहोळ यांनी आक्षेप घेत तुम्ही तुमचे व्हीजन सांगा असे सांगितले, तसेच दिवंगत माणसाबद्दल योग्य नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, धंगेकरांनी तुम्ही बोलला, मला बोलू द्या, तुम्ही ऐकत राहा असे उत्तर दिले.

या कार्यक्रमाचे काही वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण सुरू होते. दिवंगत माणसांबद्दल शक्यतो नकारात्मक न बोलण्याचा अलिखित नियम शक्यतो सर्व राजकारणी पाळतात. परंतु, धंगेकरांना समजावूनही त्यांनी दिवंगत बापटांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ त्यांचे व्हीजन सांगताना गेल्या दहा वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली देश पातळीवरची कामे. आणि मोदी सरकारच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघात झालेली कामे याचा आढावा घेतला आणि खासदार झाल्यानंतर त्यांचे व्हीजन काय असणार आहे याबाबत सविस्तर विवेचन केले. वसंत मोरे यांनीही त्यांचे व्हीजन सांगितले. रवींद्र धंगेकर यांनी मात्र, पुण्याच्या व्हीजन बद्दल न बोलता मोहोळ यांनी सांगितलेल्या कामांवर टीका टिप्पणी करत केवळ वेळ मारून नेली. त्यांना त्यांच्या व्हीजन बद्दल पत्रकारांनी विचारल्यानंतरही त्यांनी केवळ मोहोळ यांनी सांगितलेल्या पुणे शहरातील योजनांमध्ये कशा त्रुटी आहेत याबद्दलच ते बोलत राहिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत

Previous Post
Archana Patil | अर्चना पाटील यांना औसा, उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य देऊ

Archana Patil | अर्चना पाटील यांना औसा, उमरग्यातून १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य देऊ

Next Post
Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब

Related Posts
nana patole - koshyari

‘विधानसभेत छत्रपतींचा जयघोष होणारचं, कोश्यारींना परत पाठवण्याबाबत आम्ही कायदेशीत तपासणी करत आहोत’

मुंबई : आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन…
Read More
Pune LokSabha 2024 | "भाजप नेत्याचा फोटो वापरला, काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरलेला दिसत नाही"

Pune LokSabha 2024 | “भाजप नेत्याचा फोटो वापरला, काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरलेला दिसत नाही”

पुणे | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune LokSabha 2024) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) तर महाविकास आघाडी…
Read More
Krunal Pandya | आयपीएलदरम्यान पांड्या बंधूंच्या घरी आला नवा पाहुणा, कृणाल पांड्या दुसऱ्यांदा बनला बाबा

Krunal Pandya | आयपीएलदरम्यान पांड्या बंधूंच्या घरी आला नवा पाहुणा, कृणाल पांड्या दुसऱ्यांदा बनला बाबा

Krunal Pandya Son | आयपीएल 2024च्या रणधुमाळीदरम्यान पांड्या ब्रदर्सच्या घरी एक मोठी बातमी आली आहे. हार्दिकचा भाऊ कृणाल…
Read More