RCB vs DC | जाणून घ्या कोण आहे सोफी मोलिनक्स, जिने चार चेंडूत तीन विकेट्स घेत दिल्लीच्या तोंडून विजयाचा घास हिरावला

RCB vs DC | दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झालेला वुमेन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना अतिशय रोमांचक (RCB vs DC) राहिला. स्म्रीती मंधानाच्या (Smriti Mandhana ) नेतृत्त्वाखालील आरसीबीने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत शानदार खेळ दाखवत ८ विकेट्सने सामना जिंकला. या विजयासह आरसीबीने पहिल्यांदाच डब्ल्यूपीएलचा चषक उंचावला आहे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या आजवरच्या १६ हंगामातही पुरुषांचा आरसीबी संघ आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. मात्र पोरींच्या संघाने हा मान मिळवला आहे.

आरसीबीच्या विजयाची खरी शिल्पकार राहिली गोलंदाज सोफी मॉलिनेक्स (Sophie Molyneux). अवघ्या एका षटकात दिल्लीच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत सोफीचे सामन्याचा कायापालट केला. सोफीने चार चेंडूत तीन विकेट घेत दिल्ली कॅपिटल्सच्या वरच्या फळीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे दिल्लीला पुनरागमन करता आले नाही.

अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे झालेल्या WPL 2024 फायनलमध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 7 षटकांपर्यंत, दिल्लीच्या शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंगने गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली. या दोघींनी मिळून पहिल्या विकेटसाठी 7 षटकांत 64 धावा जोडल्या. शेफालीच्या बॅटमधून 44 धावा आल्या. त्याचवेळी कर्णधार लॅनिंगने 18 धावांचे योगदान दिले.

आठव्या षटकात आश्चर्यकारक घडले
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने गोलंदाजीत बदल केले आणि सोफी मोलिनक्सला गोलंदाजीची जबाबदारी दिली. आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सेट फलंदाज शेफाली वर्मा चौकार मारण्याच्या नादात झेलबाद झाल्याने दिल्लीला पहिला धक्का बसला. ओव्हरचा दुसरा चेंडू डॉट होता. तिसऱ्या चेंडूवर जेमिमाह रॉड्रिग्स खाते न उघडता क्लीन बोल्ड झाली. चौथ्या चेंडूवर एलिस कॅप्सीला क्लीन बॉलिंग करून तिसरे यश मिळवले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

WPL 2024 मध्ये पदार्पण केले
ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजी अष्टपैलू सोफी मोलिनक्सला WPL खेळाडूंच्या लिलावात आरसीबीने 30 लाख रुपयांना खरेदी केले होते. सोफीने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले आणि त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियासाठी 27 टी20 सामने खेळले. 2021 मध्ये ती तिच्या देशासाठी शेवटची खेळली होती. दुखापतीमुळे ती वर्षभर संघाबाहेर राहिली. सोफीने WPL 2024 मध्ये पदार्पण केले. आतापर्यंत तिने 10 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. यात दोनदा तीन बळींचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी