RCB | ट्रॉफी आली रे…. आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीचा स्म्रीतीला व्हिडिओ कॉल, Video

RCB vs DC | दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झालेला वुमेन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना अतिशय रोमांचक राहिला. स्म्रीती मंधानाच्या (Smriti Mandhana) नेतृत्त्वाखालील आरसीबीने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत शानदार खेळ दाखवत ८ विकेट्सने सामना जिंकला. या विजयासह आरसीबीने (RCB) पहिल्यांदाच डब्ल्यूपीएलचा चषक उंचावला आहे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या आजवरच्या १६ हंगामातही पुरुषांचा आरसीबी संघ आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. मात्र पोरींच्या संघाने हा मान मिळवला आहे. या शानदार विजयानंतर विराट कोहलीने महिला संघाला खास शुभेच्छा दिल्या.

आरसीबी पुरुष संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने महिला संघाच्या विजयाची स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली. त्याने महिला संघाचा फोटो शेअर करत ‘सुपर वुमन’ असे लिहिले आहे. यासोबत त्याने हार्ट, ट्रॉफी आणि टाळ्यांचे इमोजी शेअर केले. कोहली इथेच थांबला नाही, त्याने व्हिडिओ कॉल करून आरसीबी संघाची कर्णधार मंधानाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आरसीबीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या गोंडस क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वन इलेक्शन, वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः Jairam Ramesh

‘शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा’

मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर! अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश गोगावले यांच्या भेटी