खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा – अजित पवार

मुंबई – सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे आहे. केंद्रसरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्यसरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार यासंबंधीचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

दरम्यान खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (व्हिसीद्वारे), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले, दामूअण्णा इंगोले, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे अप्पर मुख्‍य सचिव मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार व पणन सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त धिरज कुमार (व्हिसीद्वारे), सहकार आयुक्त अनिल कवडे (व्हिसीद्वारे), पणन विभागाचे संचालक सुनिल पवार (व्हिसीद्वारे) यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील अतिवृष्टी बाधितांना राज्यसरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वाटप सुरु आहे, त्याला गती देण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलेले अनुदान तसेच आर्थिक मदत कोणत्याही परिस्थितीत बँकांनी रोखू नये. सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना संबंधित बँकांना देण्यात येतील. खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे नोंद करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह ‘सीएसआर’ फंडातून मदत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. कृषीपंपांना दिवसा सुरळीत आणि पुरेसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यसरकारने सौरपंपाची योजना आणली आहे, ही योजना अधिक सक्षमपणे राबविण्यात यावी. कर्जमाफीला पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरु असून राज्यसरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी सकारात्मक मार्ग काढल्याबद्दल शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावेळी आभार मानले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला सत्तेत रहाण्याचा अधिकारच नाही’

Next Post

एसटीचे विलीनीकरण झाल्यास राज्यकर्त्यांच्या दुकानदारी बंद होतील – पांडुरंग शिंदे

Related Posts
Prime Minister's National Award

लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मान

नवी दिल्ली, 21 : लातूर (Latur) जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’ या नाव‍िण्यपूर्ण उपक्रमांचा आज…
Read More
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मांचा घटस्फोट कायदेशीररित्या अंतिम, आज फॅमिली कोर्टात पोहोचतील

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मांचा घटस्फोट कायदेशीररित्या अंतिम, आज फॅमिली कोर्टात पोहोचतील

युजवेंद्र चहल  ( Yuzvendra Chahal)आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात बऱ्याच काळापासून घटस्फोटाच्या अफवा होत्या आणि अखेर त्यांचा…
Read More
IPL Playoff schedule 2024 | प्लेऑफचं वेळापत्रक निश्चित, पहिल्या क्वालिफायर आणि इलिमिनेटरमध्ये भिडणार 'हे' संघ

IPL Playoff schedule 2024 | प्लेऑफचं वेळापत्रक निश्चित, पहिल्या क्वालिफायर आणि इलिमिनेटरमध्ये भिडणार ‘हे’ संघ

IPL Playoff schedule 2024 | आयपीएल 2024 च्या लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. आता अंतिम लढत सुरू होईल.…
Read More