राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान 

 Mumbai – आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलेल्या एका आव्हानाची चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे. (Resign and contest elections from Worli against me, Aditya Thackeray’s challenge to the Chief Minister)

चेंबूर येथे आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले की,  महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो.