रिया चक्रवर्तीला मिळालं नवं प्रेम? सुशांतनंतर आता ‘या’ अभिनेत्रीच्या भावाला करतेय डेट

दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिची खूप चर्चा झाली होती. सुशांत मृत्यूपूर्वी रियाला डेट करत होता, ते काही महिने लिव्ह इन रिलेशनशीपमध्येही राहिले होते, अशी चर्चा होती. रियानेही सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील प्रेमाची कबुली दिली होती. आता रियाला तिचं नवं प्रेम मिळालं असल्याची चर्चा आहे.

सुशांतच्या मृत्यूच्या जवळपास २ वर्षांनंतर रिया नव्या रिलेशनशीपमध्ये अडकल्याची चर्चा आहे. ती अभिनेत्री सीमा सजदेहचा भाऊ बंटी सजदेह (Bunty Sajdeh) याला डेट करत असल्याचे समजत आहे. हिंदुस्तान टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, रिया आणि बंटी एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. परंतु ते नुकतेच रिलेशनशीपमध्ये आले आहेत. यापूर्वी बंटीचे नाव शत्रूघ्न सिन्हाची मुलगी व अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्याशी जोडले गेले होते. तसेच बंटीने अभिनेत्री सुष्मिता सेनलाही डेट केले होते.

कोण आहे बंटी सजदेह?
बंटी सजदेह फॅशन डिझायनर सीमा सजदेहचा भाऊ व एक रिऍलिटी स्टार आहे. तसेच बंटी प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्स मॅनेजर कंपनी कॉर्नर स्टोनचा सीईओ आहे. अभिनेता सलमान खान याचा भाऊ सोहेल खान हा बंटीचा भावजी पडतो. सोहेलची पत्नी सीमा सजदेह ही बंटीची बहिण आहे.

बंटीचे यापूर्वी लग्न झाले असून त्यांचा घटस्फोटही झाला आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव अंबिका होते. २००९ मध्ये त्यांनी लग्न केले होते. परंतु त्यांचे नाते जास्त दिवस टिकू शकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर बंटीचे नाव सुष्मिता सेन, दिया मिर्झा व नेहा धुपिया यांच्याशी जोडले गेले होते. २०१२ च्या आसपास तो सोनाक्षी सिन्हालाही डेट करत असल्याची चर्चा होती.