‘अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे कदाचित भाजपने अजित पवारांना बोलू दिलं नसणार’

पुणे – देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा (Dedication ceremony of stone of Saint Tukaram temple at Dehut) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना (Ajit Pawar) पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारलं. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही.

यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी टीका केली आहे. छत्रपतींचा तसंच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची (BJP) नक्कीच अडचण होत असणार. म्हणूनच कदाचित भाजपने अजित पवारांना बोलू दिलं नसणार, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असतं. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.