Rohit Pawar : अदानी-शरद पवार भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, राज्याची पॉलिसी…

Sharad Pawar Meets Gautam Adani: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांची पुन्हा भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शरद पवार गौतम अदानी यांना भेटण्यासाठी आले होते. राष्ट्रवादी फुटल्यानंतर दोघांची ही दुसरी भेट आहे. यावर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया आली आहे.

रोहित पवार म्हणाले की, शरद पवार आणि अदानी यांची भेट झाली असेल, त्यात वेगळं काय आहे. पवार साहेब अंबानी, अदानींना भेटतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. या सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्याला राज्याचा आणि देशाचा विकास करता येईल यावर चर्चा होत असते. त्यानंतर आपण पॉलिसी करत असतो. सर्व घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी कधीही करता येत नाही, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.

शिवसेना आमदार अपात्रता कारवाईबाबत रोहित पवार म्हणाले की, अपात्रतेच्या कारवाई बाबत सुप्रीम कोर्टाने जसे नियोजन केले होते तसेच नियोजन आताही झाले पाहिजे. तीन महिने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काय केले हे अख्ख्या महाराष्ट्राला सांगावे. स्वाभिमानी राज्याचे अध्यक्ष असताना सुद्धा त्यांना आज दिल्लीला जाऊन मार्गदर्शन घ्यावे लागते आहे, ही आश्चर्याची आणि दुर्दैवी गोष्ट असल्याचा टोलाही रोहित पवार यांनी नार्वेकरांना लगावला.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’