Aaditya Thackeray : महाराष्ट्रात भवितव्य नसल्यानं आदित्य ठाकरे मध्य प्रदेशात गेले ?

ज्यांनी शिवरायांचा पुतळा पाडला त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे जाऊन बसले

BJP Vs Aaditya Thackeray – राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचं अस्तित्व किंचित झालं. इथं त्यांना भवितव्य दिसत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे आज मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा सोडून ठाकरेंनी आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. आता मध्यप्रदेशात जाऊन आदित्य ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येत आहे.अशी टीका महाराष्ट्र भाजपने केली आहे.

आदित्य ठाकरेंच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर भाजपने ट्वीट करून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपने म्हटलं आहे की,खरं तर काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या आदेशानं पांढुर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीनं पाडण्यात आला होता. आज त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे जाऊन बसले आहेत. शिवरायांवर प्रेम करणारा मावळा हे कधीही सहन करणार नाही.

आदित्यजी ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याचा वारसा धोक्यात आला. ज्या काँग्रेसी वृत्तीनं शिवरायांचा पुतळा पाडला. त्या काँग्रेससोबत तुम्ही कितीही गळ्यात गळे घाला, शिवप्रेमी जनता तुमच्यासह काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जय भवानी- जय शिवराय असं म्हणत भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

https://www.youtube.com/watch?v=FA8bsQpyrSM

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’