T20 World Cup 2024 | टी२० विश्वचषकासाठी हार्दिकला कर्णधार न बनवता रोहितकडे का सोपवली गेली संघाची कमान? जय शाहने सांगितले कारण

T20 World Cup 2024 : रोहित शर्मा टी-20 विश्वचषक 2024 ( T20 World Cup 2024) मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी ही घोषणा केली आहे. बुधवारी राजकोट येथे भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात त्यांनी संघाच्या उपकर्णधाराचीही निवड केली. शाह म्हणाले की, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आगामी विश्वचषकात संघाचा उपकर्णधार असेल.

शाह यांनी कार्यक्रमात रोहितचे भरभरून कौतुक केले. हार्दिक पांड्याला कर्णधारपद देण्याऐवजी रोहितला कर्णधारपद देण्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. शहा म्हणाले, ‘हार्दिक निश्चितपणे टी-20 मध्ये उपकर्णधार असेल. T20 विश्वचषकात हार्दिकला दुखापत झाली, तर आम्ही कर्णधारपद कोणाला देऊ? थोडक्यात शाह यांना म्हणायचे होते की जर रोहित-विराट खेळले नाहीत आणि टूर्नामेंटच्या मध्यभागी हार्दिक दुखापती झाला, तर कर्णधारपद कोणाकडे सोपवायचे?

एकप्रकारे हा शाह यांचा हार्दिकवरचा टोमणा मानला जात आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात चार सामने खेळल्यानंतर पंड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून हार्दिक मैदानावर ॲक्शनमध्ये दिसला नाही आणि तो रिहॅबमध्ये आहे. त्याला कर्णधारपद न देण्यामागे हेच मोठे कारण आहे. तसेच ज्या प्रकारे हार्दिकला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले, त्यावरून रोहित आणि हार्दिकमध्ये काही मतभेद असण्याची दाट शक्यता आहे.

जय शहा म्हणाले, ‘रोहितकडे क्षमता आहे. मी म्हटल्याप्रमाणे एकदिवसीय विश्वचषकात आम्ही 10 सामने जिंकले. आम्ही फायनल जिंकलो नाही पण हा खेळाचा भाग आहे. जो चांगला खेळतो तो जिंकतो. याआधीही रोहित सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20मध्येही त्याने पुनरागमन केले. याचा अर्थ त्याच्यासोबतच आपण पुढे जाऊ. शाह म्हणाले की, अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 22 धावांत चार गडी बाद झाल्यानंतर रोहितने संघाला 212/4 पर्यंत नेले. यानंतर आम्ही याबद्दल जास्त प्रश्न विचारू शकत नाही.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole