‘उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मी जिंकलो म्हणणाऱ्या ठगाला हाकला’, अर्चना पाटलांच्या सभेत टोलेबाजी

Dharashiv Loksabha: लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात आता प्रचार सभांमधून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये जोरदार सामना बघायला मिळत आहे.  “शर्यतीच्या  रणांगणात एकटाच पळत सुटला आणि मीच जिंकलो म्हणू लागला. तो एक नंबरचा ‘ठग’ माणूस आहे आणि या ठगाला हाकलून देण्याची संधी आपल्याला आहे” अशा शब्दांत उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विद्यमान खासदार ओमाराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर नाव न घेता  टिकास्त्र सोडले.

धारशिव लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत चौगुले बोलत होते.

पुढे बोलताना आमदार चौगुले म्हणाले, जेव्हा  तिकीट वाटपावरून चर्चा सुरू होती तेव्हा येथील आपल्या जिल्ह्याचे विद्यमान  खासदार आपणच श्रेष्ठ असल्याचे समजत होते, याचं उदाहरण द्यायचं झालं तर शर्यत लागली होती आणि त्या शर्यतीच्या रणांगणात हा एकटाच पळत सुटला. निवडणुकीची तारीख आणि उमेदवारी डिक्लेअर व्हायची होती, त्याच्या आधीच हा पळत सुटला आणि मी जिंकलो म्हणू लागला तो एक नंबरचा ठग माणूस आहे, या ठगाला हाकलून देण्याची संधी आपल्याला आता मिळाली आहे. कोणी नसताना मी पहिला आलोय हे म्हणणं सोपं असतं, पण आता रणांगणात आमचा उमेदवार उभा आहे.  आता जिंकून दाखव असा आव्हान चौगुले यांनी दिले.

सर्वोच्च नेता निवडण्यासाठी अर्चना पाटलांना मत द्या
एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपण जेंव्हा प्रचाराला लोकांमध्ये  जाऊ त्यावेळी  प्रत्येकाला आपण हे पटवून दिले पाहिजे की, आपण आपला सर्वोच्च नेता निवडण्यासाठी बहुमूल्य असं आपलं मत अर्चना पाटील यांना दिले पाहिजे.  चार-पाच महिन्यापूर्वी आपल्याला उजनीच 60 टीएमसी पाणी मंजूर झालं होतं,  572 कोटीचा टेंडर झालं होतं आपला पाण्याचा प्रश्न,  विजेचा प्रश्न या निधीने सुटणार आहे.  केंद्राचा निधी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पूर्ण होणार आहे त्यासाठी विकासाचा विचार करणारा खासदार लोकसभेत जाणं गरजेचं आहे म्हणून आपण अर्चना ताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन चौगुले यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात