Sara Tendulkar: तेंडुलकरांच्या लेकीचा साजच न्यारा, बाप्पाच्या उत्सवासाठी नटली-सजली मराठमोळी सारा

Sara Tendulkar Saree Look: अवघा महाराष्ट्र सध्या गणेशोत्सव (Ganeshutsav) साजरा करत आहे. १९ सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन झाले असून १० दिवस सर्वत्र गणपती उत्सवाची धूम असेल. गणेशोत्सवासाठी महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (Sahin Tendulkar Daughter) याची मुलगी सारानेही खास पारंपरिक लूक केल्याचे दिसून आले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी गणेशोत्सवासाठी साराने ही साडी परिधान केली होती.

सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ट्रेडिशनल लूक शेअर केला आहे. तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीने पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर अशी डिझायनर साडी नेसली आहे. साराने परिधान केलेल्या साडीचा पॅटर्न अतिशय रेखीव असून ही गोपी वैद डिझाइन्स यांनी डिझाइन केलेली साडी आहे. साडीतील पारंपरिक मराठमोळा लूक आणि केसात गजरा असा अप्रतिम पारंपरिक लूक साराला खूपच सुंदर दिसतो आहे.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती