बिश्नोई गँगकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांवर सलमान स्पष्टच बोलला; म्हणाला, मुंबईपेक्षा दुबई सुरक्षित!

लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि त्याची गँग हात धुवून बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्यामागे लागली आहे. काळवीट हत्याप्रकरणी बिश्नोई गँगकडून (Bishnoi Gang) सलमानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. आता सलमान (Salman Khan) या सर्व धमक्यांबद्दल उघडपणे बोलला आहे आणि तो या सर्वांशी कसा सामना करतो? हे सांगितले आहे.

जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे सलमान खानला मुंबई पोलिसांनी Y+ सुरक्षा दिली आहे. आता, इंडिया टीव्हीच्या ‘आप की अदालत’ या शोमध्ये याबद्दल सांगताना सलमान म्हणाला, ‘असुरक्षिततेपेक्षा सुरक्षितता चांगली आहे. आता रस्त्यावर सायकल चालवणे आणि एकट्याने कुठेही जाणे शक्य नाही. पण आता मला ही समस्या आहे की जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये असतो, तेव्हा माझ्या आजूबाजूला खूप सुरक्षितता असते. पण यामुळे इतरांना त्रास होतो. लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतात. माझे बिचारे चाहते. पण गंभीर धोका असल्याने मला सुरक्षा देण्यात आली आहे.’

सलमाननं यावेळी भारत आणि दुबईमधील त्याच्या सुरक्षेविषयी मत प्रदर्शन केलं आहे. तो म्हणतो ‘आता मला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटू लागली आहे. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं मला जास्त जवळची वाटत असून मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचे दिसून येते आहे. मला जे काही करायला सांगण्यात आले आहे ते मी अतिशय सावधानपूर्वक करतो आहे. खूप काळजी घेतो आहे.’