INDvsPAK: अजूनही भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होऊ शकतो उपांत्य सामना, पाहा हे कसे शक्य आहे?

World Cup 2023: विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या पाकिस्तानच्या आशा अचानक पुन्हा जिवंत झाल्या आहेत. शनिवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पावसाने व्यत्यय आणलेल्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (DLS Method) 21 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानच्या या मोठ्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये अचानक रोमांचक वळण आले आहे. पाकिस्तानचा संघ अजूनही विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचू शकतो (World Cup Scenario) आणि त्यांचा भारताशी सामनाही होऊ शकतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरी अद्याप शक्य
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान संघाला गुणतालिकेत मोठा फायदा झाला (Pakistan Qualification Scenario) आहे. पाकिस्तान पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचे सध्या 8 सामन्यांत 4 विजयासह 8 गुण आहेत. पाकिस्तानचा नेट रन रेटही पूर्वीपेक्षा खूपच चांगला झाला आहे. पाकिस्तानचा निव्वळ रन रेट सध्या (+0.036) आहे. पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा करण्यासाठी अफगाणिस्तान संघाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने गमवावे लागणार आहेत. न्यूझीलंडचे सध्या 8 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुण आहेत. न्यूझीलंडचा निव्वळ रन रेट सध्या (+0.398) आहे.

पॉइंट टेबलमध्ये अचानक एक रोमांचक ट्विस्ट
न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना 9 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. जर न्यूझीलंड संघ हा सामना हरला तर त्याचे फक्त 8 गुण राहतील. त्याच वेळी, पाकिस्तान संघ 11 नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध 2023 विश्वचषकातील शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. जर पाकिस्तान संघाने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र, पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा करण्यासाठी अफगाणिस्तान संघाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने गमवावे लागणार आहेत.

1992 च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाने चमत्कार केला होता
1992 च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाचे पहिल्या पाच सामन्यात केवळ एक विजयासह केवळ 3 गुण होते. 1992 च्या विश्वचषकात पाकिस्तान संघ उपांत्य फेरीपूर्वीच विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर होता, मात्र त्यानंतर पाकिस्तानने सलग 3 सामने जिंकून 9 गुणांसह उपांत्य फेरीत धडक मारली होती. 1992 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला आणि अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

महत्वाच्या बातम्या-

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

ठग सुकेशला अयोध्या मंदिरात दान करायचा आहे 11 किलो सोन्याचा मुकुट, तुरुंगातून लिहिलेले पत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचणार का? जाणून घ्या समीकरण