औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे,तर देशात राहण्याचा अधिकार नाही : संभाजीराजे छत्रपती

संभाजीनगर – औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (SP leader Abu Azmi) यांनी विरोध केला आहे. औरंगाबाद शहराच्या नामकरणावरून राजकीय वातावरण तापत असतानाच अबू आझमी यांनी त्याविषयी विधान केलं आहे. ‘औरंगजेब हा वाईट व्यक्ती नव्हता’, असं विधान अबू आझमी यांनी केलं आहे. त्या विधानावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी टीका केली आहे.

संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अबू आझमी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही,’ असा घणाघात संभाजीराजे यांनी केला. याशिवाय, ‘अबू आझमी महाराष्ट्रात काय राहतायत? त्यांची असं बोलण्याची हिम्मत कशी होते?’ असा सवाल त्यांनी केला. यासोबतच, ‘अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर फेलकं पाहिजे,’ अशी टीकाही त्यांनी केली.