कोरोना झाल्यानंतरही फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; राज्यसभेसाठी बैठकीला लावणार हजेरी

मुंबई – माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार करत असून, माझ्या जे कोणी संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आपल्या सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.

दरम्यान,  कोरोनाची(Corona) लागण झाल्यानंतरही फडणवीस राज्यसभेसाठी अॅक्शनमोड असून, ते आज ऑनलाइन बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज भाजपची (BJP) बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्यसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील प्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला देवेंद्र फडणवीस ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी भाजपा (BJP)प्रदेश कार्यालयात अश्विनीकुमार वैष्णव, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत. या बैठकीसाठी भाजप नेते गिरीश महाजन, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत.