शरद पोंक्षे आतंकवादी आणि नथुरामाची औलाद; काँग्रेस नेत्या संगीता तिवारी संतापल्या

मुंबई – पुणे : वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांच्या विरोधात काँग्रेसच्या (Congress) नेत्या संगीता तिवारी (Sangeeta Tiwari) यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोंक्षे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

पोंक्षे यांनी काही दिवसापूर्वी डोंबिवली (Dombivli) येथील कार्यक्रमात अहिंसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकांची झोड उठली आहे. हिंदु समाज अहिंसक होता, नपुंसक कधी झाला समजलच नाही. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं, हे आम्हाला खरं वाटतं, पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्यांचा हा घोर अपमान आहे, असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं होतं.

पोक्षे यांचे हेच वक्तव्य कॉंग्रेसला झोंबले आहे. शरद पोंक्षे नावाचा कुणीतरी अभिनेता आहे. तो स्वतःला मोठा नेता समजू लागला आहे. पण तो नेता नाही तो आतंकवादी (Terrorist) आहे. नथुरामाची औलाद आहे. पण हा या भाषणात सांगतोय, अहिंसेचे डोस देऊन हिंदुंमध्ये नपुंसकता आली आहे. नपुंसकता हिंदुंमध्ये (Hindus) वाढलेली आहे. मी खरच याचा करेक्ट कार्यक्रम लावील. असा इशारा त्यांनी दिला आहे.