Sangli LokSabha | लोकसभेसाठी काँग्रेस इच्छुक असलेल्या सांगलीतून उद्धव ठाकरेंनी जाहीर केला उमेदवार

Sangli LokSabha | लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर आहेत. मात्र अद्याप महविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघावरून (Sangli LokSabha) शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. असे असतानाच उद्धव ठाकरेंनी कुरघोडी करत सांगलीतून आपला उमेदवार जाहीर केला आहे.

काल मिरज येथे झालेल्या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, होय आज मी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो. ते शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडून येऊन दिल्लीत जातील. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे. हा मर्द तुमच्यासाठी लढण्यासाठी मैदानात उतरला आहे. पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, या चंद्रहारची गदा तुम्ही आहात. चंद्रहार पाटील जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा त्यांनी मला एक गदा भेट दिली. ती गदा मी घऱी ठेवली आहे. मात्र मी चंद्रहार यांना सांगतो की, ही समोर दिसतेय ती तुमची खरी गदा आहे. जोपर्यंत ही गदा तुमच्यासोबत आहे, तोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्ध्याची चिंता करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात