१७ डिसेंबर बसणार ‘फ्री हिट दणका’

पुणे – भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रिकेटचे वेड आहे. याच क्रिकेटवर आधारित ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला असून यात ‘फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे. ग्रामीण कथेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील मगरे यांनी केले आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.

उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील नेत्यांमधील वैमनस्यातून क्रिकेटच्या मॅचचे आयोजन केले जाते. या मॅचचा विजेता नक्की कोण ठरतो? या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नायकाच्या प्रेमाचा बळी जातो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यामुळे अधिकच वाढली आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटात अपूर्वा एस. हिच्यासह ‘सैराट’ चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

त्या मुलीची अन् माझी ओळख नाही पण; पुन्हा विक्रम गोखलेंनी आपले मत मांडले

Next Post

पंतप्रधानांनी देशातील जनतेचा विश्वास गमावला; काँग्रेसचा दावा

Related Posts

थंडी वाढतेय… ‘या’पेक्षा खाली तापमान घसरले तर होऊ शकतो मृत्यू; वाचा मानवी शरीर किती थंडी झेलू शकते

डोंगराळ भागासह उत्तर भारतात सध्या प्रचंड थंडी पडत आहे. मुंबई, पुणे शहरही थंडीने गारठले आहेत. हाडे गोठवणाऱ्या थंडीत…
Read More
Cm_Eknath_Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईसाठी नवीन शिलेदारांची निवड

मुंबई :- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.…
Read More
भाजपची खरी ताकद फार कमी आहे; जयंत पाटील यांचा दावा 

भाजपची खरी ताकद फार कमी आहे; जयंत पाटील यांचा दावा 

जळगाव   – शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार…
Read More