Sanjay Nirupam | संजय निरुपम यांचा मोठा निर्णय! दिला काँग्रेसचा राजीनामा

Sanjay Nirupam | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मुंबई वायव्य येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाने उमेदवार दिला आहे. ही जागा काँग्रेसच्या संजय निरुपम यांना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) प्रचंड आक्रमक झाले होते. त्यामुळे काँग्रेसने (Congress) त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर आता निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनाम दिला आहे.

मी कोणत्याही परिस्थिती अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने काँग्रेसच्या धोरणांवर टीका करत होते. याच कारणामुळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या निर्णयानंतर संजय निरुपम यांनीदेखील मोठा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसे पत्र निरुपम यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवले आहे. आज (4 एप्रिल) निरुपम सकाळी 11.30 वाजता त्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत