पापाचा घडा भरला की तो फुटतोच,संजय राऊत यांना अटक होणार आहे – राणा

Mumbai – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणात (Patra chawl Scam) ईडीचे (ED) अधिकारी सकाळी सव्वासात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या घरात चौकशी करत आहेत. दरम्यान, आताच मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या दादरमधल्या घरातही ईडीने छापा टाकला आहे.

ईडी कार्यालयाबाहेर आणि संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ब्रिफिंग केलं आहे. शिवसैनिकांनी संजय राऊत यांना घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. त्यांना रोखण्यासाठी बॅरिगेंटिक करण्यात आलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राणा म्हणाल्या की, पापाचा घडा भरला की तो फुटतोच. संजय राऊत यांना अटक होणार आहे. संजय राऊत हे 25 कंपनीत भागीदार असल्याचाही गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केलायं. पुढे बोलताना राणा म्हणाल्या की, ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती