‘मला ‘संज्या’ म्हणणाऱ्या खैरेंना मी ‘चंद्या’ म्हंटले तर काय होईल?’; शिरसाट याचं थेट खटक्यावर बोट

संभाजीनगर –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दिवसेंदिवस शिंदे यांचा पाठींबा वाढत असल्याने शिंदे गटावर दुसऱ्या बाजूने जहरी टीका केली जात आहे. यातच संभाजीनगरमधील नेते हे तर अक्षरशः एकमेक्नावर तुटून पडले आहेत. यातच आता आमदार संजय शिरसाट आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील आमने-सामने आले आहेत.

दरम्यान बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर पलटवार केला आहे. मला ‘संज्या’ म्हणणाऱ्या खैरेंना मी ‘चंद्या’ म्हंटले तर काय होईल असा शब्दात शिरसाट यांनी खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

काय म्हणाले शिरसाट…?

एका मेळाव्यात बोलतांना शिरसाट म्हणाले की, मनात जे येईल त्या टीका माझ्यावर करण्यात आल्या.निष्ठा दाखवायची असेल तर दुसऱ्याला वाईट म्हणावेच लागते. पण खैरे साहेब यांच्या वयाचे मान ठेवून त्यांच्यावर टीका करायच्या नाहीत. मला संज्या म्हंटल्यावर दोन दिवसांनी एक शब्द तरी बोलले नाही. पण मला ‘संज्या’ म्हणणाऱ्या खैरेंना मी ‘चंद्या’ म्हंटले तर काय होईल टोला शिरसाट यांनी यावेळी लगावला.