स्टेशनवर अवघ्या 20 रुपयांत जेवणार साधा मुलगा जेव्हा मराठीतील सूपरस्टार होतो

माणसाचं नशीब हे कधी काय करायला लावेल हे सांगता येत नाही. भल्या- भल्याच नशीब बदलत आणि माणूस कोठच्या कोठे जाऊन पोहचतो. पण त्याने काढलेले दिवस तो कधीच विसरत नाही. यशाच्या शिखरावर जरी पोहचलं तरी माणूस जेव्हा त्यांच्या मागच्या प्रवासाकडे वळून पाहतो तेव्हा नक्कीच त्याला तेव्हा देखील भरून येतं. चित्रपट आणि मालिका यामध्ये टपोरी, गुंडांची भूमिका करणारा संतोष जुवेकर देखील असाच काही भावुक झाला होता.

निमित्त होतं झी मराठी आयोजित किचन कल्लाकार या शोचे. हा शो सध्या झी मराठीवर प्रचंड गाजत आहे. अनेक मोठे पुढारी आणि कलाकार या शोमध्ये येऊन त्यांचे पाककौशल्य दाखवत आहे. मागच्या आठवड्यात संतोष जुवेकर देखील असाच आला होता.संतोषने त्यांच्या अनेक जुन्या आठवणीना उजाळा दिला. त्यातील एक किस्सा असा. सुरुवातीच्या काळात संतोष त्यांच्या ओळखीतील नातेवाईकांकडे जेवणासाठी जातं. कधीमध्ये मित्रांकडे देखील जातं पण सतत असं दुसऱ्यांना त्रास देणे त्याला योग्य वाटतं नसतं.

मग संतोष खार स्टेशनवर एक ठिकाणी अवघ्या 20 रुपयांत थाळी मिळत असे, संतोष जुवेकर तेथे जेवत, संतोष म्हणाला त्या थाळीमध्ये तीन चपाती एक भाजी आणि वरण भात येत असत. त्यामध्ये माझं पोट भरत.

कोणी जर विचारलं कोठे आहे तर सांगतं की लीलामध्ये बसतो. आज जेव्हा जेव्हा खार स्टेशन जवळून जातो तेव्हा त्या 20 रुपयांच्या थाळीची आठवण येते. संतोष मूळचा मुंबईचा, पण त्यांच्या घरची आर्थिक स्थिती बेताची होती. कॉलेजमध्ये असल्यापासून त्याला अभिनयाची आवड होती पण अभिनय क्षेत्रात कधी इतकी ऊंची गाठेल असं वाटलं नव्हतं असं संतोष म्हणतो . या गोजीरवाण्या घरात ही संतोषची पहिली मालिका होती. ही मालिका प्रचंड गाजली होती. यातील शेखर परांजपे हे पात्र खूप गाजलं होतं. हे पात्र संतोषने केले होते.