‘माझ्या हत्येने तुमचं पोट भरत असेल तर माझा जीव घ्या, पण…’; सलमानसाठी राखी जीव देण्यासही तयार!

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) या दोघांचे नाते सर्वश्रुत आहे. राखी सलमानला आपला भाऊ मानते. त्याचबरोबर सलमानही भाऊ होण्याचे कर्तव्य पार पाडतो आणि प्रत्येक कठीण प्रसंगी राखीच्या पाठीशी उभा राहतो. कदाचित त्यामुळेच राखी आणि सलमानच्या नाते आता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या डोळ्यात खुपू लागले आहे. सलमान खाननंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने (lawrence Bishnoi Gang) राखी सावंतला धमकी दिली होती.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने राखी सावंतला धमकीचे (Rakhi Sawant Received Threat) ईमेल पाठवले असून, अभिनेत्रीला सलमान खानपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. मुंबईत कडेकोट सुरक्षा असतानाही ते सुपरस्टार सलमान खानला मारतील, असा दावाही बिश्नोईच्या टोळीने ईमेलमध्ये केला होता. यानंतर राखी खूपच घाबरली होती आणि तोंड लपवून बाहेर फिरताना दिसली होती.

परंतु आता पुन्हा राखी या प्रकरणावर बोलली आहे. मात्र यावेळी ती खुपच बिनधास्त दिसली. राखी म्हणाली की, ‘आज ईदच्या दिवशी स्पष्टपणे बोलत आहे. माझ्या भावाला हात लावू नका. भावाच्या बहिणीच्या हत्येने तुमचं पोट भरेल, तुम्हाला शांती मिळेल तर नक्कीच मी सलमान खानची बहीण राखी सावंत आहे. माझा जीव घ्या .. दिला मी आणि माझा हत्येचा गुन्हाही तुमच्या डोक्यावर येणार नाही. जा.. अल्लाह-हू-अकबर.’