माझा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी का अटक केली नाही? – टी. राजा सिंह

हैद्राबाद – प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपाचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांनी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. तुरुंगात जाण्याची भीती बाळगत नाही, असे या व्हिडीओत सिंह यांनी म्हटले आहे. मुंडकं छाटायला मी काही प्राणी नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील धमक्यांवर त्यांनी दिली आहे. माझा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी का अटक केली नाही? असा सवालही सिंह यांनी केला आहे.

23 ऑगस्टला सिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्या सिंह यांना आज पुन्हा अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना उद्देशून ना हम गोली से डरते है, ना फाँसी से, नाही जेल जाने से  असे सिंह यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. माझ्या देशाला किंवा धर्माला कोणी वाईट म्हणत असेल तर त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. हिंदू आता मागे हटणार नाही असं कॅप्शन सिंह यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओला दिलं आहे.