भगीरथ बियाणी यांचा मृतदेह पाहून खा. प्रीतम मुंडेंना आली भोवळ

बीड – भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी (BJP Beed City President Bhagirath Biyani) यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात (Phoenix Hospital) नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. (BJP city president Bhagirath Biyani commits suicide in Beed) .

दरम्यान, भगीरथ बियाणी हे बीड शहरातील एमआयडीसी परिसरात (In MIDC area) राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणींनी आज ( ११ ऑक्टोंबर ) सकाळच्या सुमारास गोळी झाडत आत्महत्या केली. आता भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली, यामागे काही राजकीय अथवा कौटुंबिक कारण आहे का, याची चौकशी आता पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

दरम्यान, खा. प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्या अत्यंत निकटचे समजले जाणारे भगीरथ बियाणी यांच्या अशा एकाएकी निधनाने प्रीतम मुंडे यांना धक्का बसला. रुग्णालयात बियाणी यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या पोहोचल्या. मात्र तेथील मृतदेह पाहूनच खा. प्रीतम यांना भोवळ आली. मुंडे यांचीही तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. अत्यंत जवळचा आणि निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने खा. प्रीतम मुंडे अस्वस्थ झाल्या. हे धक्कादायक चित्र पाहून खा. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना अश्रू अनावर झाले.