ठाकरे गटाच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं; ऋतुजा लटके यांची उमेदवारीअडचणीत?

Mumbai – अंधेरी पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  उमेदवार ऋतुजा लटके यांचा प्रचार देखील सुरु झाला आहे. मात्र ठाकरे गटाचे शिवसेनेचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. BMC जॉबमुळे ऋतुजा लटके अडचणीत येणार आहेत.

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. ऋतुजा लटके यांनी महिनाभरापूर्वी आपल्या सेवेचा राजीनामा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिका प्रशासनाने अजून मंजूर केलेला नाही.जोपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत त्या विधानसभा पोट निवडणुकीचा अर्ज भरू शकत नाहीत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे. यामुळे आता ठाकरे गटाकडे शेवटचे तीन दिवस हाती आहेत.ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिका सेवेचा राजीनामा मंजूर करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातील नेत्यांची धावाधाव सुरु आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करुन घेण्यासाठी अनिल परब यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठल्याचे समजते.