Maratha समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही – OBC महासंघ

Maratha Arakshan Andolan: जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. याचे पडसाद नांदेड जिल्ह्यात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोको, मोर्चे काढून आंदोलन केले जात आहे. तर राजकीय नेत्यांबद्दल आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेण्याची मागणी पुढे येत असून या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या मागणीला कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये घेण्यास तीव्र विरोध केला आहे. आमचा मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास विरोध आहे. त्यांना ओबीसींमध्ये घेऊ नये. तसेच त्यांना ओबीसींची प्रमाणपत्रेही देऊ नये. नाही तर आम्ही देशभर आंदोलन छेडू, असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन निर्णय घेतल्यास आम्ही आंदोलन करू. सरकारने दबावात येऊन मराठ्यांना ओबीसींचं प्रमाणपत्र दिल्यास आम्ही न्यायालयात जाऊ. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशाराच बबनराव तायवाडे यांनी सरकारला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole