वाडेश्वर कट्ट्यावर रंगला राजकीय फराळ; चंद्रकांतदादा यांच्यासह सर्वपक्षीय पक्षाध्यक्षांची उपस्थिती

Pune: पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे  (Ankush Kakade) यांच्या पुढाकाराने गत 15 वर्षे वाडेश्वर कट्टा (Wadeshwar Katta) ह्या नावाने विविध क्षेत्रातील मान्यवरांची मैफिल आयोजित करण्यात येते. ह्या वर्षी च्या दिवाळी फराळाच्या (Diwali Faral) निमित्ताने आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंकुशअण्णा काकडे, श्रीकांत शिरोळे, काँग्रेस चे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना ( एकनाथ शिंदे गट)चे शहराध्यक्ष नाना भानगिरे,राष्ट्रवादी ( अजितदादा पवार गट ) चे शहराध्यक्ष दीपक मानकर, राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भाजप चे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) चे शहराध्यक्ष संजय मोरे, आप चे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, भाजप चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, आर पी आय चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार जोशी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सौ. मेघना काकडे माने,इ मान्यवर उपस्थित होते.

राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरला असून वैयक्तिक टिकाटीप्पनी बरोबरच कमरेखाली वार करणे सुरु आहे अश्या परिस्थितीत ह्या कट्ट्यावर पुण्याची सुसंस्कृत राजकीय संस्कृती आणि सभ्यता जपली जात आहे म्हणून मी या ठिकाणी आलो असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.पवार कुटुंबिय दीपावली साजरी करायला एकत्र आले यात काहीच गैर नाही असे सांगतानाच चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटक मधील जारकीहोळ कुटुंबियांचे उदाहरणं दिले, वेगवेगळ्या पक्षात असूनही व्यवसाय एकत्र करणे, सण एकत्र साजरे करणे यातूनच कटुता संपते असेही ते म्हणाले.

आपल्या स्वभावप्रमाणे नेहमीच्या शैलीत अरविंद शिंदे यांचे टोमणे,प्रशांत जगताप यांची तात्विक भूमिका, दीपक मानकर यांनी केलेले अजितदादांच्या कामाचे कौतुक, विजय कुंभारांचा आमचा झाडू किती स्वच्छ हे सांगण्याचा प्रयत्न, नाना भानगिरे यांची मुख्यमंत्री शिंदे किती संयमाने कामं करतात हे सांगण्याची धडपड,रामदास आठवले कसं सुसंस्कृत हे सांगण्यासाठीचा मंदार जोशी यांचा प्रयत्न आणि अगदी जवळचे मित्र असूनही अंकुश काकडे आणि संदीप खर्डेकर यांचा एकमेकांवर तार स्वरात कुरघोडी करण्याचा प्रयत्न अश्या विविध स्वभाव रंगांच्या उधळणाने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. चंद्रकांतदादांच्या उपस्थिती मूळे धीरज घाटे मात्र शांत शांत होते. मोठ्या संख्येने उपस्थित माध्यम प्रतिनिधीनी मात्र मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष ह्या नात्याने दादांवर प्रश्नांचा भडीमार करून त्यांना भांडवून सोडले.

विविध राजकीय विचारसरणीच्या सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पांचा फड रंगविला व एकत्र वडे, उपमा, शिरा इ पदार्थांचा आस्वाद घेतला यातच आमचा हेतू सफल झाल्याची भावना अंकुश काकडे यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…

You May Also Like