शाहरुख खानचा जबरा फॅन! ३६ गर्लफ्रेंड आणि ७२ एक्सगर्लफ्रेंडसोबत पाहणार जवान

Shahrukh Khan’s Jawan Movie: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित जवान (Jawan) सिनेमामुळे चर्चेत आहे. आज म्हणजेच ७ सप्टेंबर रोजी भारतभरातील चित्रपटगृहात शाहरुखचा जवान सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला त्याच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. दरम्यान शाहरुखच्या एका जबरा फॅनची चर्चा रंगली आहे. या चाहत्याने शाहरुखचा जवान सिनेमा पाहण्यासाठी चक्क १८८ तिकीटे खरेदी केली आहेत.

जवान सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुखने #ASKSRK सत्र आयोजले होते. #ASKSRK सत्रादरम्यान त्याच्या चाहत्याने स्वत:चा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो ‘जवान’च्या अनेक तिकिटांमध्ये गुंडाळलेला दिसत आहे. तो डोक्यापासून पायापर्यंत तिकिटांनी झाकलेला आहे. हा चित्रपट तो कोणासोबत पाहणार आहे हेही चाहत्याने सांगितले.

हा फोटो शेअर करताना, SRK च्या या जबऱ्या चाहत्याने सांगितले की, ‘मी सर जवानसाठी ऑडी बुक केली आहे. माझ्या ३६ गर्लफ्रेंड, ७२ एक्सगर्लफ्रेंड आणि ८० मित्रांसोबत जात आहे. #AskSRK @iamsrk’. त्याच्या या पोस्टलाही खूप पसंती दिली जात आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दल चाहत्यांमध्ये किती उत्साह आहे, हेही यावरून दिसून येते.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde