किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लोकसभा निवडणूक एकत्रित लढणे शक्य – शरद पवार

मुंबई – ‘सन २०२४मधील लोकसभेची निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी येथे सांगितले आहे. भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर (Rashtriya Janata Dal) जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पवार यांनी नितीशकुमार (Nitish Kumar) यांची स्तुती केली. नितीश आमचे जुने सहकारी आहेत आणि त्यांनी योग्य राजकीय निर्णय घेतला, असे पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, भाजपने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. पैसा, ईडी आणि सीबीआय (Money, ED and CBI) यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले, तसाच प्रयोग झारखंडमध्ये सध्या केला जात आहे. भाजपच्या (BJP) या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आम्हाला ठरवावे लागेल. विरोधकांनी एकजूट झाले पाहिजे. असं देखील ते म्हणाले.