Sharad Pawar | …आता बदल केला पाहिजे असं वाटतंय; शरद पवार अखेर मनातलं बोलून गेलेच  

Sharad Pawar |  देशाचे भविष्य आणि भवितव्यासाठी निवडणुका आहेत. देशाचे अनेक जणांनी नेतृत्व केलं. देशाच्या भवितव्याची चिंता कधी नव्हती. पण गेले दहा वर्ष पाहिलं असता, आता बदल केला पाहिजे असं वाटतंय असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर  इथे आयोजित महाविकास आघाडीच्या वतीने महासभा एकनिष्ठतेची शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्या शरद पवार साहेब बोलत होते यावेळी मंचकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत,  खासदार सुप्रियाताई सुळे , आमदार शशिकांत शिंदे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आमदार संग्राम दादा थोपटे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी  उपस्थित होते. तसेच सभेला मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार  म्हणाले की, आज मी तुमच्यासमोर बारामती  लोकसभेच्या मतदार  संघाच्या उमेदवार म्हणून सुप्रियाचे नाव  म्हणून जाहीर करतोय.  सुप्रिया सुळे यांचे संसदेतील काम बोलक आहे. सध्या देशामध्ये शेतकऱ्यांविरोधात ज्या प्रकारे काम सुरू आहे. त्याला आवर घालायचा असेल तर मतदान करायाला जाल, तेव्हा ‘तुतारी’वर शिक्का मारा. आज बारामतीमधून लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करतोय असे शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन – Pankaja Munde

तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार