पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी महावितरणचा संबंध नाही – महावितरण

पुणे : पुणे महामेट्रो सेवामधील (Pune Mahametro) व्यत्ययांसाठी वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महावितरणला (Mahavitaran) जबाबदार ठरविण्यात येत आहे. तथापि, मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी महावितरणचा कोणताही संबंध नाही. पुणे महामेट्रोला महावितरणकडून (MSEDCL) नव्हे, तर महापारेषण (MSETCL) कंपनीकडून १३२ केव्ही दाबाचा वीजपुरवठा केला जातो असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडे अकराच्या सुमारास वनाज ते रूबी हॉल मार्गावरील सेवा २१ मिनिटे बंद पडली होती. मात्र विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे यंत्रणेवरील भार (LOAD) वाढल्याने महावितरणकडून वीजपुरवठा अचानक बंद झाल्याचा दावा मेट्रोकडून करण्यात आला आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, महावितरणचा पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे – पटोले

भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल:- Nana Patole

चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?