‘देशाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता राहुल गांधींच्या नेतृत्वात असल्याची जाणीव  उद्धव ठाकरे यांना झाली आहे’

मुंबई –   देशात गांधी आणि गोडसेवर नेहमीच चर्चा होत आली आहे. गांधी विचाराला माननारा मोठा वर्ग आहे परंतु संघ परिवाराने गांधी परिवाराची नेहमीच बदनामी केली आहे. गांधी हे हिंदू विरोधी आहेत असा अपप्रचार करून गांधी परिवाराची बदनामी करण्याचे काम संघ परिवार करत आला आहे अशी घणाघाती टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

ते म्हणाले,  उद्धव ठाकरे यांची शिवसेना अनेक वर्ष संघ विचारातून आलेल्या भाजपाबरोबर युतीत होती. आरएसएस गांधींबद्दल जे सांगत होते ते चुकीचे आहे हे त्यांना आता समजले आहे. राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, देशाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात आहे. उद्धव ठाकरे यांना आता वास्तवाची जाणीव झाली आहे. भाजपा हा कोणाचाही नाही, हिंदू, मुस्लीम, शिख ख्रिश्चन कोणाचाच नाही, भाजपा फक्त धर्माच्या नावावर राजकारण करत असून भाजपा फक्त सत्तेचा आहे असे पटोले यांनी सांगितले.