जैसी करणी वैसी भरणी,राऊत यांच्यावर कारवाई झाली तर शिवसैनिक आज खुश होतील – शिरसाट

संभाजीनगर – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणात (Patra chawl Scam) ईडीचे (ED) अधिकारी सकाळी सव्वासात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या घरात चौकशी करत आहेत. दरम्यान, आताच मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या दादरमधल्या घरातही ईडीने छापा टाकला आहे.

ईडी कार्यालयाबाहेर आणि संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ब्रिफिंग केलं आहे. शिवसैनिकांनी संजय राऊत यांना घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. त्यांना रोखण्यासाठी बॅरिगेंटिक करण्यात आलं आहे. दरम्यान,शिवसेनेचे बंडखोर नेते संजय शिरसाट यांनी या सर्व प्रकरणावर आता यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय शिरसाट पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि ,जैसी करणी वैसी भरणी, शिवसैनिक आज खुश होतील… जर त्यांनी काही केले असेल तर त्यांना अटक होईल … अटक होण्याची शक्यता टाळता येणार नाही … राऊतांमुळे शिवसेना फुटली असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.