Shiv Sena : संतोष बांगरांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या 20 शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती – हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. संतोष बांगर हे काल अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर बुक्क्या मारत हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगांव सुर्जी येथे येताच कार्यकर्ते वाहतांना आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तिथून निघून गेले.

दरम्यान, या घटनेप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्याच्या आरोपात गुन्हे दाखल झालेले राजेंद्र अकोटकर, अभिजित भावे, महेंद्र दिपटे, गजानन विजयकर, गजानन चौधरी, रवींद्र नाथे, गजानन हाडोळे, मयूर रॉय, शरद फिसके यांनी सोमवारी दुपारी 1 वाजता आत्मसमर्पण केलं. आणखी पाच ते सहाजणांचा हल्लेखोरांमध्ये समावेश असल्याचं ठाणेदार वानखडे यांनी सांगितलं.