सातारा – सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीने (NCP) झालेला पराभव गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र आहे. कारण शंभूराजे देसाई यांनी आता थेट राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांत शिवसेना (Shivsena) स्वबळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशाराच शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.
शंभूराजे देसाई यांनी आज शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी, राज्य सरकारच्या 2 वर्षांतील कामाची माहिती देताना, राष्ट्रवादीवर शरसंधान केलं.त्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले असून राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला आहे. तर, शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
https://youtu.be/FkhUTw1OjTM