‘निर्धार नवपर्वाचा’ ‘घड्याळ तेच वेळ नवी’ या नवीन अभियानाला, भूमिकेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद – सुनिल तटकरे

Sunil Tatkare – अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राज्य गतीमान करत पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेत आहोत आणि थेट जनतेपर्यंत प्रदेशाध्यक्ष म्हणून पोचावे म्हणून ‘निर्धार नवपर्वाचा’ ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे अभियान घेऊन जात आहोत. ही नवी भूमिका घेऊन जात असताना जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आज पूर्व विदर्भातील दुसरा दिवस असून गोंदिया येथे सुनिल तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संघटनात्मक बांधणी गावपातळीवर भक्कमपणे करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक नवे पर्व आम्ही सुरू केले असून फुले – शाहू – आंबेडकराच्या विचारांवर काम करत असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

प्रफुल पटेल यांचा अनेक वर्षाचा अनुभव आणि अजितदादांच्या नावाचे असलेले ग्लॅमर याचा फायदा आम्हाला झाला आहे. त्यामुळेच ४५ आमदार दादांच्या पाठीशी उभे राहिले शिवाय नागालँडमधील आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. आता केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यात अशांतता निर्माण झाली होती परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुशलतेने राज्यातील परिस्थिती हाताळली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण तो कुणालाही धक्का न लावता मिळाले पाहिजे ही भूमिका आमची आजही आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती नेतृत्व देण्याचे काम जनतेने केले आहे त्याबद्दल राज्यातील जनतेचे सुनिल तटकरे यांनी आभार मानले.

‘निर्धार नवपर्वाचा’ ‘घड्याळ तेच वेळ नवी’ या अभियानातंर्गत गोंदिया जिल्हयात प्रथमच येत असल्याचेही सुनिल तटकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, निरीक्षक राजेंद्र जैन, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, निरीक्षक राजेंद्र जैन, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, शिंदेंनी तात्काळ पाठवली मदत

‘हा’ हर्बल चहा तुम्हाला सर्दी, खोकला आणि विषारी हवेपासून वाचवू शकतो

लाजवाब! विराटने वाढदिवशी झळकावले झंझावाती शतक, तेंडूलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी