एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी; शिवसेनेत उभी फुट

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आल्याचं कळतं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतृत्वाने मोठा धक्का दिला आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.