दादा आणि फडणवीस वेळ पाळतात मात्र शिंदे…; झिरवाळांची टोलेबाजी

Nashik Mahayuti Melava :  नाशिकच्या महायुतीच्या मेळाव्याला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव घेत तुफान टोलेबाजी केली. झिरवाळ यांनी आपल्या भाषणात अनेकांची फिरकी देखील घेतली.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, मला शेवटी बोलायला आवडत नाही. कारण सगळे कंटाळलेले असतात. आजच्या बैठकीला जागा निवडली, ते नाव मला येत नव्हतं. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. मोदी साहेबांचा आध्यात्मावर विश्वास आहे. उद्या मकर संक्रांत आहे, आपल्याला आता गोड बोलायचं आहे. आपण तिळगुळ देऊन जे गोड तोंड करू, ते कायमस्वरूपी एकत्र राहण्याची शपथ घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

माझ्याकडे अजित दादांचे घड्याळ आहे. आम्ही दहाचा कार्यक्रम असताना, दहा वाजून दहा मिनिटांनी आलो. अजित दादांचे घड्याळ कधीच मागे पुढे होत नाही, फडणवीस साहेबही वेळ पाळतात. शिंदे साहेबांचे होतं पण ते सॉरी म्हणतात, अशी तुफान टोलेबाजी त्यांनी करताच सर्वत्र मेळाव्याला एकच हशा पिकला.

महत्वाच्या बातम्या-

शंकराचार्यांचे हिंदू धर्मातील योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना नाशिकचे साधू महंत म्हणाले…

ओरीचा भलताच जोर; थेट तृप्ती डिमरीला मिठी मारत किस घेतल्यानं एकच चर्चा रंगली

इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत लवकरच चर्चा होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार