यंदाही शिवाजीनगरमधून भाजपाला लीड मिळणार? मुरलीअण्णांसाठी आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा जोरदार प्रचार

Mulidhar Mohol Loksabha: महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराला चांगलीच सुरूवात झाली आहे. महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या मतदारसंघात चांगलेच सक्रीय झाले असून मुरलीधर मोहोळ यांना विजय करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.

काल मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सिद्धार्थ शिरोळे यांनी गोखलेनगर, निलज्योती हौसिंग सोसायटी लगत असलेल्या कुलदेवता व स्नेहसागर सोसायटीस भेट दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

पुणे लोकसभेत शिवाजीनगर मतदारसंघ हा भाजपसाठी चांगलाच महत्वाचा ठरला आहे. याच मतदारसंघातून मागील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला लीड मिळाले आहे. त्यामुळे यंदाही भाजपच्या उमेदवाराला लीड मिळावं, यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रचाराच्या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दीही दिसून येत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत