हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही – फडणवीस

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे. मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या स्वनिधीतून खेळासाठी मैदान बांधले, ज्याचे नाव टिपू सुलतान मैदान असे आहे. मात्र टिपू सुलतानच्या मैदानाला नाव देण्यास भाजपचा विरोध आहे.

टिपू सुलतानने आपल्या कारकिर्दीत हिंदूंवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केले यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि हिंदू संघटनांकडून या नावाला विरोध होत आहे. टिपू सुलतानच्या नावाने शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असे नामकरण कसे करू दिले, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

महापालिकेतील या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उडी घेतली असून टिपू सुलता यांचं नाव उद्यानाला देण्यास तीव्र विरोध केला आहे. हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही. त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे. हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विरोध केला. ज्या टिपू सुलतानानेने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही. त्यांचं नाव मैदानाला देणं अयोग्य आहे. अत्याचार करणाऱ्याचं महिमामंडन करण्याचं काम होत आहे. हा निर्णय रद्द केला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.