Dhanashree Verma: “विसरू नका की तुमची आई-बहिण पण…”, त्या फोटोवर धनश्री वर्माने दिले स्पष्टीकरण

Dhanashree Verma: युझवेंद्र चहलची पत्नी (Yuzvendra Chahal Wife) धनश्री वर्मा हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रोल्सचा सामना करावा लागला आहे. तिच्या एका फोटोमुळे धनश्री चहलला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत नात्यात असल्याच्या वावड्या नेटकऱ्यांनी उडवल्या. आता शनिवारी धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने तिला सहन कराव्या लागलेल्या प्रतिक्रियांबद्दल सांगितले.

नुकतेच धनश्रीचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर तिला टीकेला सामोरे जावे लागले होते. एका फोटोमध्ये, नुकतीच ‘झलक दिखला जा 11’ या डान्स रिॲलिटी शोची फायनलिस्ट झालेली धनश्री कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबत दिसली. त्यामुळे धनश्री आणि युझवेंद्र चहलमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या बातम्या आल्या होत्या.

चहलच्या चाहत्यांना हा फोटो अजिबात आवडला नाही आणि त्यांनी यावरुन धनश्रीवर जोरदार टीका केली. आता यावर स्पष्टीकरण देताना व्हिडिओमध्ये धनश्रीने सांगितले की, संपूर्ण परिस्थितीचा तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर खूप वाईट परिणाम झाला आहे. धनश्रीने लोकांना द्वेष पसरवण्यापासून दूर राहण्याचे आणि काही गोष्टींबाबत संवेदनशील राहण्याचे आवाहन केले आहे.

धनश्री म्हणाली, “माझ्या आयुष्यात माझ्यावर कधीच ट्रोल किंवा मीम्सचा परिणाम झाला नाही. यावेळी त्याचा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर परिणाम झाला आहे. तुम्हाला याबद्दल कसे वाटते? काही निर्णय किंवा मत मांडण्याऐवजी, विचारणे आणि प्रथम माणुसकी दाखवणे खूप सोपे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य तुम्हा सर्वांना आहे, पण तुम्ही लोक विसरलात की आमचेही एक कुटुंब आहे.”

‘तुझी आई आणि बहीणही बाई आहेत..’
या व्हिडिओद्वारे त्यांनी द्वेष पसरवणाऱ्यांना त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली की, ट्रोल करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की ती देखील तिच्या आई आणि बहिणीसारखी एक महिला आहे. धनश्री म्हणाली, “तुम्ही लोकांनी विसरू नका की मी देखील एक स्त्री आहे. तुमची बहीण, आई, मैत्रिणी, पत्नी या सर्वच स्त्री आहेत. अशा परिस्थितीत हे योग्य नाही. मी एक लढवय्यी आहे. मी कधीही हार मानणार नाही. यावेळीही मी हार मानणार नाही, सकारात्मक राहीन.”

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?