मुख्यमंत्री योगींचं ‘ते’ ट्विट चर्चेत; कुणाल कामारा म्हणाला, निदान एक फोटोशॉपवाल्याला तरी…

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय पक्षांच्या प्रचार सभा जोरदार चालू आहे. भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमध्ये सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. विरोधी पक्ष देखील निवडणूकीच्या प्रचार सभा घेत आहेत. अशातच आता योगी आदित्यनाथ यांनी ट्विट वर एक फोटो शेअर केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टिकाटिप्पणी केली जात आहे. यावर प्रसिद्ध कॉमेडीयन कुणाल कामाराने देखील हटके अंदाजात प्रतिक्रिया दिल्याने ते ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

योगी आदित्यनाथ यांनी जनपद इटावा, इतिहास रचने जा रहा है. ‘आतंकियों के रहनुमा’ और अपराधियों के सरपरस्त’ यहां पस्त होंगे. इटावा ने ठाना है, हर बूथ पर कमल का फूल खिलाना है. धन्यवाद इटावा. अशापद्धतीचं ट्विट शेअर केले आहे. त्या कँप्शनसोबत त्यांनी लोकांना अभिवादन करतानाच फोटो टाकला आहे. परंतु त्या फोटो मधील लोकं दुसरीकडे तर योगी आदित्यनाथ हे हातवारे दुसरीकडे करताना दिसत आहे. त्यामुळे हा फोटो इडीट केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे.

 

योगी आदित्यनाथ यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तो फोटो रिट्विट करत कुणाला कामारा म्हणाला की, तुमच्या पक्षाकडे ५,००० कोटी रुपयांची देणगी आहे. किमान एक फोटोशॉपवाल्याला तरी नोकरीवर ठेवलं असतं. अल्ट न्यूज या फँक्ट चेकिंग वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांनी देखील ट्विट करत म्हटलं आहे की, हा फोटो एडिट केलेला आहे. त्यांनी हा फोटो डिसेंबर २०२१ मधील १ कोटी स्मार्टफोन वाटपाच्या कार्यक्रमातील असल्याचं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. १० फेब्रुवारी पासून ते ७ मार्चपर्यंत या निवडणूका पार पडणार आहेत. तर १० मार्च रोजी मतदान मोजणी होणार आहे. यामधील पहिला टप्पा पार पडला आहे. समाजवादी पार्टी यावेळी भाजपला मोठी टक्कर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर कॉंग्रेस देखील प्रचार सभांचा धुरळा उडवत आहे.