अल्पसंख्याक समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीशी – Ajit Pawar

अजितदादा पवार यांच्या निर्णयाला राज्यभरातील अल्पसंख्याक समाजाने मोठ्या प्रमाणात समर्थन दिले आहे - सुनिल तटकरे

Ajit Pawar  – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी अजितदादा पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज घेण्याची हमी वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनी संदर्भात अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, तसेच अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींसाठी शिक्षणासाठी विविध योजनेतून लाभ देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. राज्यभरातील आपल्या अल्पसंख्याक समाजातील सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अल्पसंख्याक समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास अजितदादा पवार यांनी यावेळी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. अजितदादा पवार यांनी जो २ जुलै रोजी निर्णय घेतला महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा त्याला राज्यभरातून अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात समर्थन दिले आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकांना एकत्र घेऊन आम्ही काम करत आहोत. महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकारी करतील असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार डॉ.किरण लहामटे, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे राज्यप्रमुख इद्रिस नायकवडी, कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण व राज्यभरातील अल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?