‘उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा …’; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं

Sanjay Shirsat: २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्रीपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून देण्याचा शब्द दिला होता, असा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. ते धाराशिव दौऱ्यातील सभेत बोलत होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या विधानाला दुजोरा देत भाजपाला धक्का दिला आहे.

मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेण्याबाबत शब्द दिला होता या बद्दल काल उद्धव ठाकरे यांनी तुळजा भवानीची शपथ घेतली ती खरी आहे, अशी स्पष्टोक्ती संजय शिरसाट यांनी दिली. पण पहिले अडीच वर्ष भाजप घेणार होतं आणि नंतरची अडीच वर्ष शिवसेना घेणार होते. पण त्यांना युती करायचीच नव्हती भाजपसोबत जायचेच नव्हते, यासाठी त्यांनी पहिले अडीच वर्षाची अट घातली. शेवटच्या क्षणी भाजपने त्यांना पहिले अडीच वर्षे देण्याचं मान्य केले. पण तरीही त्यांनी युती न करण्याचा निर्णय घेतला, शरद पवारांनी ठाकरेंना पाच वर्षे मुख्यमंत्री पदाची ऑफर केली होती या लालसेपोटी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला होता, असंही शिरसाट म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर