भटकी जनावरे शेतातही फिरकणार नाहीत, शेतकरी ‘या’ उपायांनी आपली पिके वाचवू शकतात

पुणे – पिके जनावरांमुळे खराब झाल्याची तक्रार शेतकरी अनेकदा करतात. अशा परिस्थितीत त्यांना आर्थिक फटका बसतो. अनेक ठिकाणी तारेचे कुंपण घातले जाते. काही ठिकाणी करंट सुद्धा दिला जातो त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यूही होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक जुगाड सांगणार आहोत, ज्याद्वारे पिकाला प्राण्यांपासून वाचवता येते.

आजच्या काळात भटक्या प्राण्यांची समस्या सोडवण्यासाठी बायो-लिक्विड स्प्रे खूप उपयुक्त ठरू शकतो. भटके प्राणी, वन्य प्राणी शेताच्या जवळही येत नाहीत. पिकामध्ये फवारणी केल्यास कोणताही चुकीचा परिणाम होत नाही. उलट त्याचा वापर केल्याने पिकावरील कीटक आणि किडींचाही नायनाट होतो.

शेतकरी पिकांच्या मध्यभागी बुजगावणे लावतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. शेतकरी बांधवांचा हा स्वदेशी जुगाड आहे. असे करूनही भटकी जनावरे शेतात जात नाहीत. पिकांचे रक्षण करण्यासाठी कोणीतरी शेतात उभे असल्याचे जनावरांना वाटते. त्यामुळे भटकी जनावरे शेतात येत नाहीत. शेतकर्‍यांना ते बसवणे खूप किफायतशीर आहे. याशिवाय शेतकरी शेताच्या कड्याभोवती औषधी पिके लावू शकतात. जनावरांना औषधी पिके खायला आवडत नाहीत. अशा स्थितीत कड्यावर औषधी पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होऊन पीक सुरक्षित राहील.

जंगलालगत शेती असणार्‍या अनेक शेतक-यांनी वन्य प्राण्यां पासुन शेतातील पिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने शेतात ’ खोपडी ’ तयार करून रात्रीच्या सुमारास जीव धोक्यात घालुन ’जागल’ सुरू केल्याने काही प्रमाणात का होईना वन्य प्राण्यां पासुन पिकांचे संरक्षण होत आहे. याशिवाय आवज करणारी नवी उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत जी वापरून तुम्ही शेतीचे संरक्षण करू शकता.